विशेष प्रतिनिधी
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयएलएस (ILS) विधी महाविद्यालयात एका ३५ वर्षीय विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थी ३५ वर्षांचा असून तो सध्या एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तो महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात राहतो. त्याच वसतिगृहात राहणाऱ्या आणि त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या पाच २० वर्षीय विद्यार्थ्यांनी त्याला गेल्या काही दिवसांपासून लक्ष केले होते. या पाच तरुणांनी फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करून, त्याला अपमानास्पद वागणूक देऊन, मानसिक छळ करत होते तर लहान मोठा वयातील अंतराचा विचार न करता सातत्याने त्रास दिला.
पीडित विद्यार्थ्याने सुरुवातीला डेक्कन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला होता. पोलिसांनी या अर्जाची सखोल चौकशी केली आणि आरोपांमध्ये तथ्य असल्याचे आढळल्यानंतर पाचही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव खालील प्रमाणे…
१. आदित्य सिंह
२. सुमित गायकवाड
३. राजहंस देशमुख
४. स्वराज गायकवाड
५. उज्वल राज
या पाचही जणांवर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थ्याने या छळाबाबत महाविद्यालय प्रशासनाकडेही दाद मागितली होती. मात्र, प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली होती का? आणि या तक्रारीवर त्यांनी काय कृती केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. कायद्याचे शिक्षण देणाऱ्या संस्थेतच कायद्याचे उल्लंघन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रॅगिंग हा कायद्याने गुन्हा असून, या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात येऊ शकते. सध्या डेक्कन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
A shocking form of ragging at the renowned ILS Law College in Pune
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या सौंदर्याचा ‘बळी’ देऊन मलिदा लाटण्याचा डाव; १५ वर्षांत कोट्यवधींच्या उलाढालीचे नियोजन!
- नाशिक पाठोपाठ मुंबईत कॉर्पोरेट जिहाद, तरुणीचा अश्लील मेसेजद्वारे छळ
- भाजपाची ३० उमेदवारांची यादी तयार! दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; “या”नावांचा समावेश..
- janaakrosh rally : जनआक्रोश रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल