विधानपरिषदेची संधी हुकल्याने अमोल मिटकरींची उघड नाराजी; पक्षश्रेष्ठींनाच केला सवाल..

विशेष प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेवर पुनश्च संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र, मिटकरी यांनी तीव्र शब्दात उघड नाराजी स्पष्ट केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, ‘ झिशान सिद्दिकी यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली, त्याबद्द त्यांचे अभिनंदन आहे.परंतु, ज्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली, ती जागा त्यांची स्वतःची होती.

मिटकरी प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, ६ वर्षांच्या कार्यकाळात नेहमी शेतकऱ्यांचे,तरुणांचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रश्न मांडले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिथसाबाबत कोणी चुकीचे विधान केले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले.अजित पवारांच्या संदर्भात विचारण्यात आलेले प्रश्न,उपस्थित केलेले सवाल हीच त्यांना डावलण्याची कारण ठरली आहे का? असा सवाल यावेळी मिटकरी यांनी उपस्थित केला.



पक्षातील वरिष्ठ नेत्यावर नाराजी..

वरिष्ठ नेत्यांवर अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलताना कारण स्पष्टपणे सांगायला हवे होते.भौगलिक आणि सामाजिक योगदान असताना देखील मला का नाकारण्यात आले,याचे उत्तर हवे असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.

मिटकरींचे ट्विट चर्चेत…

अमोल मिटकरी यांनी तिकीट कापल्यानंतर रात्री ट्विट केले आहे.त्यांनी पोस्ट मध्ये म्हणले आहे की, ‘ माझ्या लढाईचे हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी मी 29 जानेवारीला केली होती दादा…हरकत नाही..तुमच्यासाठी ‘ एक संधी ‘ काय अशा ‘ हजार संधी ‘ अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढलो होतो, आणि उद्याही लढत राहील, या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो नाय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल! अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही, वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल..

Amol Mitkari’s open displeasure over missing the opportunity of the Legislative Council; He questioned the party leaders..

 

महत्वाच्या बातम्या