विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये मतभेद, संजय राऊत काँग्रेसवर संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोघांनी आग्रह धरला होता. मात्र, महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आले. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मतभेद झाले असून खासदार संजय राऊतव्यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे. Sanjay Raut

प्रत्येक वेळेला काँग्रेसच्या मनात काही शंका असतात असा टोला मारत राऊत म्हणाले, राज्यसभेलाही शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांना शंका होत्या. पण त्यांनीच अगोदर पाठिंबा दिला आणि ते ठपका कायम आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या जागी शिवसेनेने विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकेच म्हणायचे आहे की, आपली संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला वाटप करुन घ्यावे लागेल. राज्यसभा शरद पवार यांना गेली. विधान परिषद ही शिवसेनेला गेली.

ढील विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी, अशा प्रकारची चर्चा होऊ शकते.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मला काल काँग्रेसने विचारले की, आम्हाला काय मिळू शकते? आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला आम्हाला वारंवार सांगायचे आहे की, आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत.



डिलिमिटेशनच्या बिलाला काँग्रेसने विरोध केला. हे विधेयक नामंजूर झाले. मोदींचा पराभव झाला. त्यात आमच्या पक्षाचे 9 खासदार हे काँग्रेससोबत होते” याची आठवण खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला करून दिली.

“2029 मध्ये जर संधी आली तर काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. त्याला प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा असेल. त्यामुळे राज्यातील प्रादेशिक पक्ष हे अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असे वातावरण तयार करणे हे काँग्रेसच्या नेतृत्वाचे कर्तव्य आहे, असे मी मानतो. महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका,” असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी काँग्रेसला मारला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या शब्दात ,मोठे व्हिजन ठेवा. आम्हाला या देशात नेतृत्व परिवर्तन करायचे आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान असावा अशी आमची भूमिका आहे. अशावेळी विधान परिषद अथवा इतर पदासाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये ही शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. कदाचित अशीच भूमिका काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची असू शकते,” असेही ते पुढे म्हणाले.

Rift in MVA over legislative council polls, Sanjay Raut lashes out at Congress

महत्वाच्या बातम्या