अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक आयुक्त हिरे, सहायक निरीक्षक स्वामी यांच्यासह ८ जणांना ‘महासंचालक पदक’ जाहीर

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य पोलीस दलातर्फे दिला जाणारे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia) जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली यांच्यासह एकूण ८ जणांचा समावेश आहे.

पोलीस दलात बजावलेली उत्कृष्ट सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि गुन्हे तपासातील कौशल्याबद्दल दरवर्षी हे पदक प्रदान केले जाते. यंदाच्या यादीत पिंपरी-चिंचवडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते पोलीस शिपायांपर्यंत विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवले आहे.



पदक जाहीर झालेले अधिकारी व कर्मचारी:

१. डॉ. बसवराज तेली (अप्पर पोलीस आयुक्त)
२. डॉ. विशाल हिरे (सहायक पोलीस आयुक्त)
३. प्रवीण स्वामी (सहायक पोलीस निरीक्षक)
४. राजेंद्र कोणकेरी (सहायक उपनिरीक्षक)
५. दीपक महाजन (सहायक उपनिरीक्षक)
६. आशिष बोटके (पोलीस हवालदार)
७. संतोष शिंदे (पोलीस हवालदार)
८. यामिनी ठाकरे (पोलीस शिपाई)

DG medal announced for eight officers including Basavaraj Teli

महत्वाच्या बातम्या