विशेष प्रतिनिधी
पुणे : Nasarpur Case नसरापूर येथील धक्कादायक प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात वकिलांनी कठोर भूमिका घेतली आहे. भोर बार असोसिएशनने एकमताने निर्णय घेत, या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र कोणताही वकील स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.Nasarpur Case
भोर बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उरणकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, समाजमन संतप्त करणाऱ्या या घटनेमुळे वकिलांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. “अशा प्रकारच्या गंभीर आणि अमानुष गुन्ह्यांमध्ये आरोपीचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. या निर्णयाला स्थानिक वकिलांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.Nasarpur Case
दरम्यान, पुणे जिल्हा बार असोसिएशनमधील वकिलांनी देखील या प्रकरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरोपीला कायदेशीर मदत मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यायप्रक्रियेत प्रत्येकाला कायदेशीर प्रतिनिधित्वाचा अधिकार असला, तरी या प्रकरणात वकिलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वेगळे चित्र निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे नसरापूर प्रकरण अधिकच चर्चेत आले असून, पुढील न्यायप्रक्रियेवर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lawyers refuse to represent accused in Nasrapur case
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा