विशेष प्रतिनिधी
पुणे: Monstrous Act राज्यात सध्या चाललंय तरी काय ? असा सवाल उपस्थित होतोय, नसरापूर प्रकरण शांत होत नाही तोवरच पुण्यातील पर्वती भागातील जनता वसाहत परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेत, एका ५० वर्षीय आजोबाने आपल्याच ७-८ वर्षांच्या सख्ख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, मुलीने केलेल्या आरडाओरड्यामुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.Monstrous Act
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जनता वसाहत परिसरातील एका घरात पीडित मुलगी आणि तिचे आजोबा (आईचे वडील) होते. यावेळी घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून नराधम आजोबाने चिमुरडीचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
मुलीचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घराच्या दिशेने धावले. घराच्या पत्र्यांच्या फटीतून पाहिल्यावर नागरिकांना हा संतापजनक प्रकार दिसून आला. संतापलेले लोक जमा झाल्याचे पाहून आरोपी आजोबाने घाबरून मुलीला घराच्या माळ्यावर लपवून ठेवले. मात्र, लोकांचा वाढता दबाव पाहून अखेर मुलगी बाहेर आली आणि तिने झालेला प्रकार सांगितला.Monstrous Act
संतप्त जमावाकडून आरोपीला चोप!
ही घटना समजताच जनता वसाहतीतील नागरिक आक्रमक झाले. जमलेल्या संतप्त जमावाने आरोपी आजोबांना पकडून चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात नेले.
परिसरात तणाव आणि पोलिसांचा फौजफाटा!
या घटनेचे पडसाद संपूर्ण पर्वती परिसरात उमटले आहेत. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा काढला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जमावाला शांत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पोलिस कारवाई
पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील नसरापूर प्रकरणाची पुनरावृत्ती या घटनेमुळे थोडक्यात टळली असली, तरी या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
Monstrous Act! Minor Girl’s Screams Thwart Assault Attempt by Biological Grandfather; Angry Mob Thrash Accused
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा