विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील पर्वती परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलीच्या ९ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ५० वर्षीय नराधम आजोबांना पर्वती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मजुरीचे काम करते. उदरनिर्वाहासाठी बाहेर जावे लागत असल्याने तिने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला आणि मुलाला आजोबांकडे विश्वासाने ठेवले होते. मात्र, रक्ताच्या नात्याला विसरून या नराधम आजोबाने या विश्वासाला तडा दिला.
घटनेच्या दिवशी आरोपी अंबादास यल्लाप्पा जाधव हा दारूच्या नशेत होता. घरात नात आणि नातू दोघेही असताना, आरोपीने नातवाच्या हातात काही पैसे दिले आणि त्याला घराबाहेर खाऊ आणण्यासाठी पाठवून दिले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने आपल्याच ९ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचे कपडे काढू लागला.
शेजाऱ्यांच्या सतर्कतेने टळला अनर्थ!
आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी चिमुरडीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात काहीतरी गैरप्रकार घडत असल्याचे आले. त्या महिलेने त्वरित धाव घेतल्यामुळे त्या नराधमाचे मनसुबे उधळले गेले आणि मोठा अनर्थ टळला.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी अंबादास जाधव याला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीमध्ये आरोपीचे वय ५० वर्षे सांगण्यात आले होते, मात्र तपासादरम्यान आरोपीचे वय ७० वर्षे असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
पर्वती पोलिसांनी या नराधम आजोबावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि पॉक्सो (POCSO – Protection of Children from Sexual Offences Act) अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद केली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
समाजात संताप!
ज्या नात्यात सुरक्षितता मिळायला हवी, तिथेच अशा प्रकारे अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
Shocker in Parvati Area; Grandfather Arrested for Attempting to Assault 9-Year-Old Granddaughter
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा