‘सरकार अश्रू पुसणार नाही’; मनोज जरांगेंची टीका, मोठ्या आंदोलनाची घोषणा’

विशेष प्रतिनिधी

जालना: राज्यात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभा टाकण्याची चिन्हे आहेत.’ सरकारला कितीही प्रेमाने सांगितले तरी ते आपल्या डोळ्यातील अश्रू पुसणार नाहीत ‘ अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.१६ मे रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद आयोजित करून पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख ठरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मनोज जरांगे म्हणाले की,’ सरकारला मराठा समाजाची कोणतीच कामे होऊ द्यायची नाहीत.मराठा समाजातील मुले कर्जबाजारी होत आहेत.आणि या परिस्थितीला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे.सातारा संस्थांचे गॅजेट का लागू होत नाही? मराठा आंदोलकांवरील केसेस का मागे घेण्यात येत नाहीत? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले.



यावेळी त्यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबतही स्पष्ट संकेत दिले. “आता शांत बसून चालणार नाही. आपल्या हक्कांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागेल. समाजातील प्रत्येक बांधवाने कट्टरतेने आणि एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन करत त्यांनी हे आंदोलन मोठे आणि निर्णायक ठरेल, असे सूचक विधान केले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘ शेवटचं एकदा मैदानात उतरणार’

“आता शांत बसून चालणार नाही.आपल्या आपले हक्क मिळवायचे असतील,तर समाजातील प्रत्येक बांधवाला पुन्हा एकदा कट्टरतेने आंदोलनाच्या पवित्र्यात यावं लागेल”.राज्यात लवकरच मोठे आणि शेवटचे आंदोलन लवकर उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१६ मे रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार, आंदोलनाचे स्वरूप काय असणार आणि सरकार यावर काय प्रतिक्रिया देणार,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘Government will not wipe away tears’; Manoj Jarange’s criticism, announcement of a big protest’

 

महत्वाच्या बातम्या