विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शनिवारी मातोबाची आळंदी येथे प्रवचनाची सेवा संपवून परतत असताना निर्जनस्थळी संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी लवांडे यांच्या गाडीला अडवून धक्काबुक्की व शाईफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Lavande ink attack case
याबाबत लवांडे यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दादागिरी केली. शाईफेक करतानाचाच ४१ सेकंदांचा व्हिडिओ मुद्दाम शूट करण्यात आला, मात्र त्याआधी झालेली धक्काबुक्की आणि धमकावण्याचा प्रकार चित्रित करण्यात आलेला नाही. या घटनेत लवांडे यांच्या चालकाला देखील मारहाण करण्यात आली असून त्याचा शर्ट फाटल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर शरद पवार यांनी तत्काळ लवांडे यांच्याशी संपर्क साधून आज सकाळी प्रत्यक्ष भेट घेत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला.
गेल्या दीड महिन्यापासून वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात लवांडे करत असलेल्या मोहिमेबाबतही पवारांनी माहिती घेतली.
दरम्यान, शरद पवार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून लवांडे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Sharad Pawar calls DGP, Pune Police Commissioner over Lavande ink attack case
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा