बाळासाहेबांच्या विचारांपासून शिवसेना दूर नेण्याचा प्रयत्न झाला म्हणूनच उठाव, एकनाथ शिंदे म्हणाले आता दुसरा टप्पा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून शिवसेना दूर नेण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा 2022 मध्ये आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. त्या निर्णयाला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले आणि त्यानंतर पक्षाची ताकद सातत्याने वाढत गेली. आता सहा खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचा विस्तार आणखी वेगाने होणार असून हा पक्षबांधणीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आहे,” असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Eknath Shinde

प्रवेश केलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दिना पाटील, संजय बंडू जाधव, संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार मतदारसंघांच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेत दाखल झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, 2022 मध्ये पक्षातील 40 आमदारांनी घेतलेल्या भूमिकेला सुरुवातीला विरोध झाला होता. “तेव्हा एकही आमदार निवडून येणार नाही, असे विरोधक सांगत होते. मात्र जनतेने आमच्या भूमिकेवर विश्वास ठेवला आणि 40 आमदारांचे 60 आमदार झाले. आता शिवसेना बळकट करण्याच्या लढ्याचा दुसरा टप्पा सुरू झाला असून सहा खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले. हे सर्व खासदार पुढील निवडणुका शिवसेनेच्या तिकिटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर लढवून विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.



शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न झाल्यानंतर 2022 मध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव करण्यात आला. त्या निर्णयाला महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिला आणि त्यानंतर पक्षाची ताकद वाढत गेली. आता सहा खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका करत, “काही लोकांनी विचारधारा सोडली आणि महाराष्ट्राने त्यांना नाकारले,” असे म्हटले. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना असून विकास हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन खासदारांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की, “एकनाथ शिंदे तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल. तुमच्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला जाईल. आपण आता एका परिवाराचा भाग आहोत. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतदारसंघांच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.”

पत्रकार परिषदेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Shiv Sena revolt was triggered by departure from Balasaheb’s ideology; now begins phase two, says Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या