pratap sarnaik : खासगी ट्रॅव्हल्समधील अवैध मालवाहतुकीला लागणार लगाम, मंत्री सरनाईकांकडून कठोर कारवाईची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : pratap sarnaik विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (23 जून) विधानसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी राज्यात खासगी बसेसमध्ये कुरिअर पार्सल सेवेच्या नावाने अवैध मालवाहतूक होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. तर सभागृहातील सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि सिद्धार्थ शितोळे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. यावेळी राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीpratap sarnaik

आमदार शंकर जगताप प्रश्नोत्तराच्या माध्यमातून खासगी बसेसमधून होणाऱ्या मालवाहतुकीचा मुद्दा उपस्थित म्हटले की, अनेक खासगी बसेसमध्ये डिकीसह थेट बसेसच्या वरच्या टपावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक माल आणि अवजड पार्सल लादले जातात. प्रवासी वाहतुकीच्या मूळ संरचनेनुसार अशा प्रकारे टपावर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणे बेकायदेशीर आहे. यामुळे बसच्या ब्रेकिंग सिस्टीम, टायर आणि सस्पेन्शनवर प्रचंड ताण पडतो. घाटांमध्ये किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात भीषण अपघातांचा धोका निर्माण होतो. या गंभीर समस्येवर बोट ठेवत, दोषींवर सातत्याने कारवाई करूनही हे प्रकार सुरूच असल्याचे आमदार जगताप यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.pratap sarnaik



यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालक आणि चालकांवर यापुढे दंडाव्यतिरिक्त कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. त्यासाठी एक ‘ॲक्शन प्लॅन’ करण्यात आला आहे. यामध्ये पहिला गुन्हा केल्यास परवाना (परमिट) 7 ते 10 दिवसांसाठी निलंबित होणार. दुसरा गुन्हा केल्यास परवाना 10 ते 15 दिवसांसाठी निलंबित होणार. तिसरा गुन्हा केल्यास परवाना 15 ते 30 दिवसांसाठी निलंबित होणार. चौथा गुन्हा केल्यानतर परवाना थेट कायमचा रद्द केला जाणार आहे. त्याशिवाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जात असून वायू वेग पथकामार्फत 2025-26 मध्ये मालवाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बसेस संवर्गातील 5 हजार 728 दोषी वाहनांवर कारवाई केली आहे. यामधून 4 कोटी 61 लाख 78 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. तसेच 1 एप्रिल ते 31 मे 2026 पर्यंत 1454 दोषी वाहनांवर कारवाई केली असून 78.18 लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तर, राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरील पदपथांवर अनधिकृतपणे बसेस थांबवल्या जाऊ नयेत, यासाठी या जागेच्या मालकी हक्काबाबत महापालिकांकडून माहिती मागवण्यात आली असून भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरपालिकांना अधिकृत बस थांबे तयार करण्यासंदर्भात कळविण्यात आले असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाने 8300 बसेस घेतल्या असल्याने सध्या एसटी बसेसची कमतरता नाही. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विभागासाठी अधिकच्या एसटी बसेसची मागणी केल्यास त्यांनाही त्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती सुद्धा यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी विधानसभेत दिली.

Crackdown on illegal cargo transport in private buses Pratap sarnaik

महत्वाच्या बातम्या