विशेष प्रतिनिधी
मुंबई : FDA प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. २५ मे ते २४ जून या कालावधीत राज्यातील ४४६ आस्थापनांवर छापे टाकून ५ कोटी ५५ लाख ५ हजार २९४ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या कारवाईत ४५७ जणांना अटक करण्यात आली.FDA
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांत प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.FDA
कोकण विभागात सर्वाधिक १५५ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. येथे २८.७७ लाख रुपयांचा माल जप्त करून १५६ जणांना अटक करण्यात आली. मुंबई विभागात ९० आस्थापनांवर छापे टाकून ३९.०२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला, तर ८९ जणांना अटक झाली.
नाशिक विभागात ३१ आस्थापनांवर कारवाई करत १.४३ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि २९ जणांना अटक करण्यात आली. नागपूर विभागात ३८ आस्थापनांची तपासणी करून ९६.८८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला तसेच २९ जणांना अटक झाली.
पुणे विभागात ८७ आस्थापनांवर कारवाई करून ८४.८९ लाख रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागात ३८ आस्थापनांवर कारवाई करत ९६.८८ लाख रुपयांचा माल आणि १३ वाहने जप्त करण्यात आली. अमरावती विभागात २५ आस्थापनांवर कारवाई करून १.१४ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
या महिनाभराच्या विशेष मोहिमेत राज्यभरातून एकूण ४५७ जणांना अटक करण्यात आली असून ५.५५ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली.
FDA seizes Rs 5.55 crore gutkha, 457 arrested in statewide crackdown
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली