विशेष प्रतिनिधी
पुणे: लोणावळा ग्रामीण परिसरात घडलेल्या उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. Ketan Agarwal
केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
विशाल अग्रवाल यांनी केलेली जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केली. यासंदर्भात त्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक निर्देश दिले. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दिल्याची माहिती देण्यात आली.
लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी… pic.twitter.com/JGAsQVCOvd— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2026
Ketan Agarwal murder case to be tried in fast-track court; Ujjwal Nikam appointed special public prosecutor
महत्वाच्या बातम्या
- संजय दिना पाटलांची पत्रकारांना दमबाजी; फडणवीसांची तीव्र नाराजी; आता शक्यता कारवाईची!!
- मोदी सरकारने बरोबर नस दाबली; FCRA कायद्यातली दुरुस्ती धर्मांतराचे उद्योग करणाऱ्या चर्चला खटकली!!
- नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी; पण जन्मठेप की फाशी, न्यायालयाने निकाल ठेवला राखून!!
- महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर; पण म्हणाले, आमचे खासदार नाही फुटणार!!