विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackerays शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी चार दिवसांपूर्वीच पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या राजकीय घडामोडीनंतर पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवस विदर्भाचा दौरा करणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे आज (26 जून) नागपुरला रवाना झाले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने प्रवास केला.Thackerays
खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे 27, 28 आणि 29 जून असे तीन दिवस विदर्भाचा दौरा करत आहेत. या काळात ते यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी शहर, धाराशिव शहर आणि शिर्डी येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते नागपूर असा विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत, युवा आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई सुद्धा होते. महत्त्वाचे म्हणजे याच विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रवास केला. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या सीट बाजू-बाजूला होत्या. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एका सीटवर बसले होते, तर देवेंद्र फडणवीस बाजूच्या सीटवर होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या सीटवर संजय राऊत आणि अनिल देसाई हे बसल्याचे पाहायला मिळत आहे.Thackerays
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी इंडिगोच्या विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विमानात भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी हस्तादोंलन केलं आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली आहे. एकीकडे राज्यात शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
Thackerays travel with CM on same flight
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली