विशेष प्रतिनिधी
मोहोळ: मोहोळ मतदारसंघातून घोटाळेबाज रमेश कदम यांच्या मुलीला शरद पवार मिळालेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना शरद पवार यांनी राजू खरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली होती. Siddhi Ramesh Kadam cancle canditate now raju khare
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी-तिसरी यादी जाहीर होत आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक असताना उमेदवार बदलला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरल्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. आता शरद पवार यांनी सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केली असून सिद्धी यांच्याऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे.
Sachin Sawant : सचिन सावंतावर वरुण सरदेसाई भारी, गळ्यात मारली अंधेरी, सावतांनी नाकारली उमेदवारी
दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक जण नाराज झाले होते. त्यानंतर काल मोहोळ मधील इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती.
अखेर सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर सिद्धी कदम यांचा एबी फॉर्म रद्द करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले. त्यामुळे सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली. त्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मोहोळमधून मविआतर्फे राष्ट्रवादीचे राजू खरे हे निवडणूक लढवणार असून त्यांचा सामना यशवंत माने यांच्याशी होणार आहे.
रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घोटाळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती.सिद्धी कदम निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कमी वयाच्या आमदार म्हणून नवे रेकॉर्ड होऊ शकले असते.
Siddhi Ramesh Kadam cancle canditate now raju khare
महत्वाच्या बातम्या
- Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
- Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
- Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी