Supriya Sule : बापू पठारे यांच्यासाठी सुप्रिया सुळे मैदानात, अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule : बापू पठारे यांच्यासाठी सुप्रिया सुळे मैदानात, अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

वडगाव शेरी  : Supriya Sule वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही पोर्शे कार अपघात प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. Supriya Sule

क्रांतिवीर लहुजी उस्ताद साळवे सभागृह, लक्ष्मी नगर, येरवडा येथे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या सुषमा अंधारे,महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे ,प्रमुख पदाधिकारी या सभेला व्यासपीठावर उपस्थित होते

परिसरात आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले . राज्यातील सरकारने केलेली अनिर्बंध उधळपट्टी,भ्रष्टाचार,दिशाहीन कारभार,राज्याची झालेली पीछेहाट,वाचाळपणा,घसरलेली प्रचाराची पातळी आणि वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा निष्क्रिय पणा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आसूड ओढले.

सुळे म्हणाल्या, काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही, माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. येथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत. जशी तुम्हाला येथीली माहित आहे तशी आम्हालाही माहीत आहेत. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा.

सुळे म्हणाल्या, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे शंभर टक्के विजयी होतील,निष्क्रिय ठरलेल्या विद्यमान आमदारांचा मतदार धडा शिकवतील

मी याला संधी दिली,मी त्याला संधी दिली ‘,असे काही जण म्हणत असतात. पक्षाने संधी दिली,असे म्हणत नाहीत.आता तर अंडीपिल्ली बाहेर काढण्याची भाषा करतात.त्याच भाषेत बोलणे योग्य नाही.पण,तुम्ही मागचे काही काढणार असाल ,तर आम्हालाही तुमची काही माहिती आहे.’तू तू ,मैं मैं ‘ची लढाई करणार नाही ,पण ‘करारा’जबाब देऊ, असा इशारा त्यांनी दिला .

विद्यमान आमदाराने पाच वर्षात काय केले हे बोलण्यात काही अर्थ नाही.आता शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे.नवे विश्व उभारावे लागणार आहे.बापूसाहेब पठारे यांनी त्यांच्या परिसरात कोणताही अपघात झाला तर पोलीस स्टेशन ला न जाता हॉस्पिटलला जावे,असा शब्द मला द्यावा,असे आवाहन करताना विद्यमान आमदारांना लक्ष्य केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले,’ महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढत आहे. वडगाव शेरीत देखील ही एकी दिसत आहे, त्यातून बापूसाहेब पठारे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

घणाघाती भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या ,वडगाव शेरीमध्ये बदमाश गिरी चालू आहे.विद्यमान आमदार राडारोडा टाकून पूर आणायचे काम करतात तर पठारे कुटुंबीय पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचे काम करत आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.या मतदारसंघाचे आणि माझे भावनिक नाते असून मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे.थिल्लरपणाला हे मतदार थारा देणार नसून या मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी महाविकास आघडीच्या हाती देणार आहेत. नियोजनपूर्वक विकास करून सर्व पायाभूत सुविधा मार्गी लावून आधुनिक पुणे निर्माण करण्याचे वचन मी देत आहे.मतदारांना कायम उपलब्ध राहून उत्तरदायी राहीन याचा पुनरुच्चार त्यांनी या सभेत केला.

Supriya Sule Backs Bapu Pathare, Sends Direct Warning to Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023