विशेष प्रतिनिधी
लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.
फडणवीस म्हणाले, भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम होत आहे. भारत जोडो हा एक समूह तयार करण्यात आला आहे. या समुहात अशा अनेक संघटना आहेत ज्या अतिशय डाव्या विचारसरणीच्या आहेत.
ज्यांची ध्येय धोरणे, कामाची पद्धत पाहिली तर अराजक पसरवणारी ही यंत्रणा आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम याच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे.