विशेष प्रतिनिधी
पुणे: मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने रस्त्यावर अश्लील वर्तन आणि लघुशंका पुण्यातील गौरव आहुजा याला सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने रस्त्यावर अश्लील वर्तन केले . या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. Gaurav Ahuja
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी चुकलो, मला एक संधी द्या, असं म्हणत गौरव आहुजा माफी मागताना दिसत आहे. मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी”, असे गौरव आहुजाने म्हटले आहे.
पुण्यात सकाळच्या वेळेला बीएमडब्ल्यू कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात हा प्रकार घडला. या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसोर अश्लिल चाळे केले. यानंतर त्या तरुणाने सिग्नलवर लघुशंका केली.
या गाडीत बसलेला हा तरुण मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. हे qदोघेही तरुण दारु प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले.
आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे.
Gaurav Ahuja, who was found doing obscene acts on the streets of Pune, is in police custody.
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल