विशेष प्रतिनिधी
सातारा: विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सातारा आणि सांगली मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकाच जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील आणि अभय जगताप हे दोन्ही नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दोन अर्ज भरण्याचे कारण काय?
सातारा आणि सांगली विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कारण आता पुढे आले आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभय जगताप यांच्या खांद्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे.अभय जगताप सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.वैद्यकीय अडचणीमुळे विधानपरिषद निवडणूक लढवायची की नाही,याबद्दल अभय जगताप संभ्रमात असल्याचे बोलेल जात आहे.अभय जगताप यांच्या वैद्यकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन उमेदवारी अर्ज भरून घेतले जात आहेत.अचानक जगताप यांनी माघार घेतली, तर निवडणुकीत पक्षाची अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून,पुढे परिस्थिती पाहून एक अर्ज माघारी घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
साताऱ्यात शिंदेसेनेत नाराजी नाट्य..
साऱ्यात शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी कायम आहे.नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील मतभेद अजून कायम आहेत.मात्र, महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्या वादाचा परिणाम विधानपरिषद निवडणुकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे.फलटण येथे झालेल्या सभेअगोदर महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली.त्यामुळे महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यात सुरू असलेल्या राजकीय कलहाचा फटका महायुतीला विधानपरिषद निवडणुकीत बसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Two applications from NCP for the same seat, sparking political discussions in Satara
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन