Bhaskar Jadhav : कोणत्या नियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट, भास्कर जाधव यांचे सरकारला आव्हान
विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट कायद्यात कुठेही नाही. भाजप सरकारमध्ये सौजन्य आणि लोकशाहीवर विश्वास नाही. विधिमंडळाच्या कोणत्या नियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यांची अट आहे, हे सरकारने दाखवावे, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिले आहे.











