IndiGo’s : इंडिगोच्या विस्कळीत सेवेचा आमदारांनाही फटका, चार्टड विमानाने नागपूरला रवाना

विशेष प्रतिनिधी

पुणे : IndiGo’s राज्य विधिमंडळाचे उद्यापासून (सोमवार) नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना नागपूरला पोहोचायचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने अनेक आमदारांची विमानाची तिकिटे रद्द झाली आहेत. या गोंधळामुळे, पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील नागपूरला जाणाऱ्या आमदारांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. IndiGo’s

चंद्रकांत पाटील आज दुपारी खासगी चार्टर्ड विमानाने पुण्याहून नागपूरसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार जाणार आहेत. पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ही माहिती दिली. IndiGo’s



अधिवेशनासाठी आज अनेक मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, इंडिगोच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर विमानांच्या गोंधळामुळे नियोजनाचा बोजवारा उडाला. मुंबई आणि पुण्याहून येणारी उड्डाणे रद्द झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींना नाईलाजाने विमानवारी सोडून ‘समृद्धी महामार्गा’ने नागपूर गाठावे लागले आहे. तर काही नेते रेल्वेने नागपूरमध्ये दाखल झाले.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश आमदार हे पुण्याहून विमानाने नागपूरला जातात. मात्र पुणे विमानतळावरून नागपूरला जाणाऱ्या विमानाच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत

MLAs also affected by IndiGo’s disrupted service, left for Nagpur by chartered flight

महत्वाच्या बातम्या