Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dr. Gauri Garje-Palve  भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे – पालवे यांची आत्महत्या नव्हे तर खून होता. त्यांना तीन जणांनी गळा दाबून ठार मारले, असा आरोप गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी केला.Dr. Gauri Garje-Palve

डॉक्टर गौरी गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबीतील वरळीतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे पती अनंत गर्जे यांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गौरीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूवर शंका व्यक्त केली आहे. गौरीचे वडील अशोक पालवे यासंबंधी म्हणाले, गौरीच्या मृत्यू प्रकरणात फक्त अनंतच आरोपी नाही. त्याचे बहीण व भाऊ यांचाही यात समावेश आहे. ते ही या प्रकरणी आरोपी आहेत. पण पोलिसांनी अद्याप त्या दोघांना अटक केली नाही.Dr. Gauri Garje-Palve



अनंत गर्जे लग्न होण्यापूर्वीपासून वरळीत राहत होता. माझ्या मुलीला तिघांनी गळा दाबून मारले. आम्ही खरे बोलत आहोत. एकतर आम्हाला न्याय द्या किंवा आम्हाला मारण्याची अथवा मरण्याची परवानगी द्या. न्यायवैद्यक पथक घरात गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्या घरात उपस्थिति होते. त्यामुळे गौरीच्या मृत्यूला आत्महत्येचे लेबल लावू नका, असे ते म्हणाले.

यावेळी गौरीची आई अलकनंदा पालवे यांनी अनंत गर्जेला मिळालेल्या न्यायालयीन कोठडीवर संशय व्यक्त केला. आरोपी अनंतला या प्रकरणात एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी देण्याची गरज नव्हती. कारण, गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती खंबीर तरुणी होती. आरोपीला एवढ्या लवकर का न्यायालयीन कोठडी दिली? यातील 2 आरोपी अजून पकडण्यात आले नाही. ते दोघेही फरार आहेत. पोलिस प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. पण आज 12 दिवस लोटलेत. तपासात काहीच निष्पन्न झाले नाही. सर्वजण खोटे बोलत आहेत. अनंत गर्जे गौरीला दररोज मारत होता. अनंत गर्जेची बहीण व भाऊही तिला मारहाण करत होता. त्यामुळे त्यांचीही या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, असे अलकनंदा पालवे यांनी सांगितले.

पोलिसांनी या प्रकरणी अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीचाही जबाब नोंदवला आहे. तिने 2022 पासून आपला व अनंत याचा कोणताही संबंध नाही. विशेषतः गौरीला घरात सापडलेल्या कागदपत्रांची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचा दावा तिने केला आहे. वरळी पोलिसांनी कोर्टात ही माहिती दिली आहे.

Dr. Gauri Garje-Palve strangled to death by three, father alleges

महत्वाच्या बातम्या