Ajit Pawar : पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर अजित पवार बरसले
काही प्रवक्ते पक्षाची प्रतिमा उंचावण्याऐवजी खालावण्याचे काम करत आहेत. त्यांना आता मायनस करावे लागेल अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर बरसले. महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्या वादाच्या संदर्भातून अजित पवारांनी या कानपिचक्या दिल्याची चर्चा होती.











