महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर! अधिवेशनामुळे वेळापत्रक बिघडले
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागल्यानंतर लगेचच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार आहे
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागल्यानंतर लगेचच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार आहे
जे हरियाणात घडले ते बिहारमध्येही घडेल. बिहारमधील मतदार याद्यांमध्येही घोटाळे झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ रोजी मतमोजणी होणार आहे.
अमेरिकन राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र विरोधानंतरही भारतीय वंशाचे गुजराती मुस्लिम झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ( New York mayoral election) जोरदार विजय मिळवला आहे.
राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने वीज दरवाढ रद्द केली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) २५ जून २०२५ रोजी दिलेला पुनर्विचार आदेश बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने तो रद्द केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरजेडी म्हणजे ‘रंगदारी’, ‘जंगलराज’ आणि ‘दादागिरी’चे प्रतीक असल्याचे सांगत लालू यादव यांच्या पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली.
मी कोणताही मास्टरमाइंड नाही, माझी आणि फलटण तालुक्याची बदनामी थांबवा. तत्कालीन डीवायएसपी राहुल धस यांच्या कार्यकाळाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने देशभरात तीव्र राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबा येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी म्हटले की, “देशातील फक्त १० टक्के लोक न्यायव्यवस्था, नोकरशाही, उद्योग आणि अगदी सैन्यावरही नियंत्रण ठेवतात. उरलेले ९० टक्के दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील लोक कुठेच दिसत नाहीत.लष्करालाही जातीय राजकारणाचा रंग देण्याच्या राहुल गांधी यांच्या असंवेदनशीलतेवर टीकेची झोड उठली आहे.
Pune Leopard Attack शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात नागरिकांच्या जीवावर बेतलेला नरभक्षक बिबट्या अखेर ठार करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला पाठवली गेली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आता मला 100 टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी राजदच्या उमेदवारावर थेट हल्ला चढवला आहे.