Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Prakash Surve
महाराष्ट्र

आई मराठी मेली तरी चालेल, मावशी उत्तर भारत जगायला पाहिजे, आमदार प्रकाश सुर्वे यांचे वादग्रस्त विधान

मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले आहे.

महाराष्ट्र

सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप ‘मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून’, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भर सभेत अश्रू अनावर

फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे एका ‘मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून’ करण्यात आले आहेत.

sharpshooter
पुणे

sharpshooter : नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले, शार्प शूटरची पथके दाखल

पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचा हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक संतप्त झाले आहेत. रविवारी संतप्त जमावाने वनविभागाची गाडी पेटवून दिली होती. आज पुणे – नाशिक महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको केला. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Ashish Shelar
महाराष्ट्र

Ashish Shelar : भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही, ठाकरे बंधु हिंदूविराेधीअसल्याचा आशिष शेलार यांचा आराेप

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच दिसले का? भोईर पाटील दिसले पण आसमा दिसली नाही. उद्धव ठाकरेंची भूमिका ही भूमिपुत्रांच्या विरोधातील दिसून येत आहे. ठाकरे बंधू हिंदू विराेधात आहेत अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते व महायुती सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबई

Ashish Shelar : चांगले मंत्रीपद नसल्याने आशिष शेलारांच्या बुद्धीला गंज, संदीप देशपांडे यांचा पलटवार

Ashish Shelar : आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता का गंज लागला मला माहिती नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रीपद दिलं नाही, कदाचित त्यामुळे असेल, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र

एका-एका घरात 40-50 मतदार, निवडणूक आयोग आहे की भुताटकी, उद्धव ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोग भूताटकी आहे. एका-एका घरात 40-50 मतदार आहे. मतदारांना आवाहन आहे की, तुमच्या घरात तुमच्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणाला घुसवले आहे का? हे तपासले पाहिजे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

Chakor Gandhi
पुणे

चकोर गांधी पुन्हा चर्चेत, पुण्यातील जैन ट्रस्टच्या आणखी एका जमिनीच्या विक्रीवर रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंगची जमीन तब्बल २३० कोटी रुपयांना गोखले बिल्डर्सला बेकायदेशीररीत्या विकल्याची घटना अद्याप ताजी असतानाच, आता आणखी एका जैन ट्रस्टच्या जमिनीच्या विक्रीचा संशयास्पद व्यवहार समोर आला आहे.

Dadar Kabutarkhana
महाराष्ट्र

Dadar Kabutarkhana : दादर येथील कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचे आजपासून उपोषण

दादर येथील कबूतरखाना (Dadar Kabutarkhana) पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात उपोषण आंदोलन केले जाणार आहे.

पुणे

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द, बार कौन्सिलची कारवाई

सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या वकिली सनद रद्द करण्याची कारवाई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने केली आहे. न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबाबत सार्वजनिक चर्चेदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरे यांनी घातले मागाठाणेच्या वेतोबाला गाऱ्हाणे

२०१२ ला आपण इथं गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे. त्यानंतर सुनील प्रभू महापौर झाले. पुढचं मी सांगत नाही, पण तसंच गाऱ्हाणं आताही आपल्या देवाला घातलेलं आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Piyush Goyal
मुंबई

Piyush Goyal मुंबई कोस्टल रोडच्या कामातील अडथळे दूर, उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

सागरी महामार्गासाठी खार जमिनीचे हस्तांतरण करण्यापासून ते भूसंपादन, सीआरझेड, पर्यावरण मंत्रालय तसेच वनखात्याच्या परवानग्या मिळाल्याने या मार्गाच्या कामातील अडथळे दूर होत लवकरच हे काम मार्गी लागत असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिली.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : बिहार सरकार दिल्लीतून मोदीजींच्या आदेशानुसार चालतेय, राहुल गांधी यांचा आरोप

बिहार सरकार दिल्लीत मोदीजींच्या आदेशानुसार चालत आहे. येथे तुमच्यासाठी सरकारकडे जमीन नाही, परंतु मोदीजींकडे अदानी आणि अंबानींसाठी भरपूर जमीन आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी खगरिया येथील सभेत बोलताना केला.