महाराष्ट्राचा खेळ बिहारमध्ये, नितीश कुमार नुसतेच हार घालण्यापुरते वर, अखिलेश यादव यांची टीका
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ज्यांच्या बाजूने निवडणूक लढवली गेली त्यांना मुख्यमंत्री बनवले गेले नाही, बिहारमध्येही तेच होणार आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ज्यांच्या बाजूने निवडणूक लढवली गेली त्यांना मुख्यमंत्री बनवले गेले नाही, बिहारमध्येही तेच होणार आहे.
हिंदूंना दोन मुले आहेत, पण मुस्लिम बांधवांना मोठ्या संख्येने मुले आहेत. त्यांचे रेशन बंद होईल. आपल्या ८२ टक्के सनातनींच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे; हे चालणार नाही.
बिहारमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. उद्योगपतींची हत्या होत आहे. अलिकडेच निवडणूक प्रचारादरम्यान एका नेत्याची हत्या करण्यात आली. महिला असुरक्षित आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली.
ऑपरेशन सिंदूर हे एक धर्मयुद्ध होते आणि पुढेही चालू राहील. आम्ही कोणत्याही निष्पाप लोकांना इजा केली नाही, किंवा नमाज किंवा कोणत्याही धार्मिक प्रार्थनेच्या वेळी हल्ला केला नाही, असे भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले.
एकादशीच्या दिवशी श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी पहाटे भीषण चेंगराचेंगरी झाली.
आंदेकर-कोमकर टोळी युद्धामधून पुन्हा एकदा एकाचा बळी गेला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील एका गुंडाच्या भावाचा गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना कोंढवा येथील खडी मशीन चौकात शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी काही भिकारी नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले आहे.
Bala Nandgaonkar : मतदार याद्यांमधील घोळ, आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा असल्याकारणाने या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव देण्यात आले आहे.
महाविकास आघाडी अन् मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ३० जूननंतर होणार आहे. कारण यंदाच्या वर्षी सरकारवर मोठा आर्थिक भार पडला आहे. परंतु, जाहीरनाम्यात शब्द दिल्याने सरकारने तो निर्णय घेतला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, हे असं सारखं सारखं होणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईमध्ये शहरातील कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते. त्यानंतर जैन धर्मीयांनी याबाबत संताप व्यक्त करत आंदोलन केले होते. तसेच, कबुतरांना खायला खाद्य घालण्यासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली होती. त्यांनतर या वादावर महापालिकेने एक तोडगा काढल्याचे समोर आले आहे. जैन धर्मियांच्या मागणीनंतर मुंबई महापालिकेने जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय, के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम तसेच टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली – मुलुंड जकात नाका, ऐरोली – मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व) आणि आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या 4 ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जैन धर्मियांना कबुतरांच्या प्रकरणात दिलासा मिळणार आहे.
राज्यातील मतदारयादीतील घोळ, दुबार नावे, बोगस नोंदी आणि गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी यांच्याकडून निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी या प्रकरणाचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली जाणार असून मतदारयादीतील दोष, विसंगती आणि गैरव्यवहारांचे ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत. या याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडून मतदारयादीत पारदर्शकता आणण्याची आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणी करण्यात येणार आहे