Karnataka : कर्नाटकमध्ये मासिक पाळी काळात महिलांना महिन्यातून एक पगारी रजा, सरकारी, खासगी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही बंधनकारक
महिलांच्या आरोग्य व सन्मानाचा विचार करत कर्नाटक सरकारने गुरुवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘पीरियड लीव्ह पॉलिसी २०२५’ ला मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, कारखाने आणि औद्योगिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना महिन्यातून एक पगारी मासिक पाळीची रजा मिळणार आहे. म्हणजेच महिलांना वर्षभरात १२ दिवसांची पगारी रजा घेण्याचा हक्क राहील.











