Global Hatred Drove : संपूर्ण जगाचा राग म्हणून पंधरा हजार जणांना मारण्याचा कट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Global Hatred Drove  मोहरमच्या मिरवणुकीत उंदराचे विष म्हणून जाणार्‍या झिंक फॉस्फाइडमिश्रीत गोळ्या वाटप करताना अटक केलेल्या फैयाज प्रेमजीला कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज (28 जून) स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या पत्नीपासून विभक्त राहत होता आणि त्याला संपूर्ण जगाचा राग होता. याच रागातून सूड घेण्यासाठी त्याने सदरचा गुन्हा केला का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.Global Hatred Drove

शुक्रवारी मोहरम असल्याने भायखळा परिसरारत एका मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जवळपास अडीच ते तीन हजार लोक सामिल झाले होते. भायखळ्याच्या अंजीवाडी येथून निघालेल्या या मिरवणुकीत फैयाज प्रेमजी सामिल झाला होता. याच मिरवणुकीत सलमान सय्यद हा आला होता. तो मूळचा गोवंडीचा रहिवाशी असून मातम केल्यानंतर त्याने थोडा आराम करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याला बुरखाधारी महिलेने पेनकिलर गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर तो त्याच्या गोवंडीतील घरी निघून गेला. मात्र काही वेळानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशाच प्रकारे मिरवणुकीत सामिल झालेल्या इतर चार ते पाच जणांना त्रास झाला होता. या सर्वांना संबंधित पेनकिलर गोळ्या घेतल्याचे समोर आले. हा प्रकार भायखळा पोलिसांना समजताच त्यांनी त्या गोळ्यांचे वाटप करणार्‍या व्यक्तीचा शोध सुरू केला होता.Global Hatred Drove



ही शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी फैयाज प्रेमजीला ताब्यात घेतले. चौकशीत तो पुण्याचा रहिवाशी असून मोहरम मिरवणुकीसाठी मुंबईत आल्याचे समोर आले. मुंबईत आल्यानंतर तो डोंगरीतील एका गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना काही गोळ्या सापडल्या. तर त्याच्या गेस्ट हाऊसमधील रुममध्ये छापा टाकल्यानंतर तिथे पोलिसांना झिंक फॉस्फाईड भरलेल्या 14 हजार 900 कॅप्सुल सापडल्या. तपासात या गोळ्या झिंक फॉस्फाईटमिश्रीत असल्याचे समोर आले. या प्रकारानंतर फैयाज प्रेमजीविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याला आज दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत पोलीस तपासात फैयाज हा पुण्यातील विमाननगरचा रहिवाशी असून तो तिथे त्याच्या वडिलांसोबत राहत असल्याचे समोर आले. ते दोघेही रंग बनविण्याच्या कारखान्यात कामाला आहेत. महत्त्वाचे म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी फैयाज प्रेमजी पुण्यातून मुंबईत आला होता. त्यानंतर तो डोंगरीतील एका गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होता. याच गेस्ट हाऊसमधील रुममधून पोलिसांना 30 हजार गोळ्या सापडल्या. त्यापैकी 14 हजार 900 गोळ्यामध्ये झिंक फॉस्फाईड भरले होते. फैयाजने 50 किलो झिंक फॉस्फाइड ऑनलाईन मागविले होते आणि याच गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असताना त्याने प्रत्येक कॅप्सुलमध्ये एक ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरले होते. गेस्ट हाऊसमधील सर्व साहित्य पोलिसांनी जप्त करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे.

दरम्यान, दोन वर्षांपासून फैयाज त्याच्या पत्नीपासून विभक्त राहत होता. तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती आणि त्याच्यावर मानसोपचार सुरू होते. त्याला संपूर्ण जग त्याच्या विरोधात गेल्याचे वाटत होते. त्यामुळे त्याला या जगाचा सूड घ्यायचा होता. या सुडाच्या भावनेतून फैयाज प्रेमजी याने सदरचा गुन्हा केला का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच तो त्याच्या वडिलांसोबत राहत होता. त्यामुळे त्याच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांच्या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Global Hatred Drove Alleged Plot to Kill 15,000, Investigators Claim’

महत्वाच्या बातम्या