Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sansthan Trust
Uncategorized

Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sansthan Trust : पूरग्रस्तांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थान ट्रस्ट, आळंदी यांच्याकडून २१ लाख रुपयांची मदत

पुणे : Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sansthan Trust : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानांकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. काल सिद्धिविनायक गणपती ट्रस्टच्या वतीने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. आता राज्यातील इतर देवस्थानेही शेतकऱ्यांसाठी पुढे येताना दिसत आहेत.

Maharashtra
महाराष्ट्र

Maharashtra : ब्रेकनंतर पाऊस पुन्हा महाराष्ट्रात धडकणार! कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांसोबत जनावरं आणि शेतजमिनी देखील वाहून गेले आहेत. मात्र, आता दोन दिवसांपासून पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. ही विश्रांती मात्र काहीच दिवसांची असल्याचा अंदाज आता हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Vijay Vadettiwar
Uncategorized

Vijay Vadettiwar शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

काेणी रांगाेळी काढावी, त्यातून उद्रेक व्हावा असा डाव आखण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vandana Chavan
पुणे

Vandana Chavan : “महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा फटका नागरिकांना आणि शहराला बसता कामा नये.” वंदना चव्हाण

 पुणे : Vandana Chavan : माजी महापौर आणि खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची भेट घेऊन पुण्यातील टेकड्या आणि जैवविविधता उद्यान (बीडीपी) क्षेत्रांच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याची मागणी केली. त्यांनी यासंदर्भात एक पत्र सादर केले, ज्यात राज्य सरकारने टेकड्या आणि बीडीपी संरक्षणासाठी स्थापन केलेल्या माजी आयएएस अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटासमोर महानगरपालिकेने संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा, असे नमूद केले.

Owaisi
महाराष्ट्र

Owaisi : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओवेसी सज्ज ; काय असणार रणनीति?

सध्या राज्यात सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक स्थानिक व राजकीय पक्ष यासाठी आपला कसून जोर लावतांना दिसत आहेत. अनेक दिग्गज नेते देखील यामध्ये वैयक्तिक लक्ष घालतांना दिसत आहेत. ज्यात एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, राज ठाकरे यांसारख्या नेत्यांचा समावेश होतो. यात आता असाउद्दीन ओवेसी यांच देखील नाव जोडलं गेलं आहे.

Ravindra Dhangekar
पुणे

Ravindra Dhangekar : कसं काय पुणेकर! कुठे आहे धंगेकर?

पुणे : Ravindra Dhangekar : ‘हू इज धंगेकर?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, भाजपचा बालेकिल्ला असणारा कसबा मतदारसंघ जिंकणारे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, दिवाळीपूर्वी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

मुंबई : Devendra Fadnavis : राज्यात अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रूपये वितरित करणे सुरू केले आहे. नुकसानीबाबत सामुहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू. ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Asaduddin Owaisi
महाराष्ट्र

Asaduddin Owaisi : ‘झेडपी’- महापालिकांच्या निवडणुकीत ओवेसी काँग्रेसच्या नाकात दम आणणार !

पुणे : Asaduddin Owaisi : येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत

Dharashiv
महाराष्ट्र

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात शेतकर्‍यांना वसुलीच्या नोटीसा !

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सगळ्यात जास्त परिणाम हा शेतीवर होत आहे. विशेषतः मराठवाडा परिसरात अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतजमिनी देखील वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसान भरपाई देण्याची राज्यभरातून मागणी होत आहे.

Konya Dam
महाराष्ट्र

Koyna Dam : कोयना धरण परिसराला वर्षात तिसर्‍यांदा भूकंपाचा धक्का !

सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिति निर्माण झाली आहे. अनेक नागरिक यामुळे त्रस्त आहेत. अशातच आता पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात मध्यरात्री पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. मंगळवारी (ता.३०) मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.

cancer treatment
महाराष्ट्र

cancer treatment : कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण , १८ रुग्णालयांतून त्रिस्तरीय सेवा

राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक कर्करोग उपचार मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा राज्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (MAHACARE Foundation) ही स्वतंत्र कंपनी स्थापन होणार आहे.या फाऊंडेशनच्या भागभांडवलासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना एकसमान दर्जाचे उपचार मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र

पुराचे पाणी हटले नसल्याने पंचनामे रखडणार, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली भीती

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतातील पुराचे पाणी अद्याप हटले नाही. त्यामुळे तिथे लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई देखील रखडण्याची भीती आहे.