परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर घणाघात; अमेरिकेला व चीनलाही सुनावले
संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. त्याचबरोबर अमेरिका व चीनच्या अन्यायकारक व्यापार पद्धतींवरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.











