विशेष प्रतिनिधी
मुंबई : Weather Update: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या जोरदार पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मालमत्ता आणि जीवितहानी झाल्याचे दिसून येत आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. घरे, रस्ते वाहून गेले असून, अनेक गावे जलमय झाली आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, हवामानात झालेल्या बदलामुळे आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत मुंबईसह मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
राज्यातील डिप्रेशनचे अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत पावसाचा जोर ओसरणार आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान पश्चिमेकडे सरकत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या भागातून पुढे जाईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र गुजरात किनारपट्टीजवळ ईशान्य अरबी समुद्रात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील हवामानशास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यासाठी फ्री डायल जाहीर करण्यात आला आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाचा जोर उद्यापर्यंत कमी होईल. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही.
Weather Update : The intensity of rain in Marathwada will decrease in the next 24 hours; possibility of rain in Dhule, Nandurbar, Nashik.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…