OBC Maha Elgar बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा; चळवळीत मात्र अंतर्गत मतभेद!
गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलकांनी राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या त्यांच्या मागणीने त्यांनी सरकारच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे सरकारने काही दिवसातच त्यासंबंधी एक जीआर काढत आरक्षणासंदर्भात पाऊलं उचलायला सुरुवात केली. मात्र या जीआरमुळे ओबीसी समाजात मात्र तीव्र असंतोष पाहायला मिळाला.











