Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Joy Mini Train
महाराष्ट्र

Joy Mini Train : जाॅय मिनी ट्रेनमधून घेता येणार महाबळेश्वर- तापाेळ्याचा आनंद

महाबळेश्वर ते तापाेळा आणि कोयनानगर-नेहरूनगर निसर्गरम्य परिसराचा आनंद पर्यटकांना घेतायावा यासाठी जाॅय मिनी ट्रेन सुरू करण्याची याेजना आखली जात आहे. दोन ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar : सभापतींचा खास माणूस! गॅंगस्टर निलेश घायवळवरून राेहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा

विशेष प्रतिनिधी पुणे : Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात पुण्यातील गुंड निलेश घायवळ सक्रीय झाल्याचा आरोप आमदार राेहित पवार यांनी

Munaf Pathan
महाराष्ट्र

Munaf Pathan : कृष्णा आंदेकरचा शुटर मुनाफ पठाण आहे तरी कोण ?

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठेत आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि संपूर्ण पुणे या घटनेने हादरले. आज (ता.१८) या हत्या प्रकरणातील फरार आरोपी मुनाफ पठाणला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Manikrao Kokate drags Rohit Pawar to court
महाराष्ट्र

Manikrao Kokate drags Rohit Pawar to court : विधीमंडळात रमी खेळल्याचा आराेप, माणिकराव काेकाटेंनी राेहित पवारांना खेचले काेर्टात

नाशिक : Manikrao Kokate drags Rohit Pawar to court : तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव काेकाटे विधीमंडळात कथितपणे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ ट्विट करत आराेप करणे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. काेकाटे यांनी राेहित पवार यांच्या विरुध्द मानहानीचा दावा केला आहे. या प्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणीत कोकाटेंनी रोहित पवार यांना मी नेमका रमीच खेळत होतो हे कशावरून? असा सवाल केला आहे.

Rahul Gandhi
महाराष्ट्र

Rahul Gandhi : राहुल गांधींचा कांगावा म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ ; मतचोरीच्या आरोंपावर भाजपाचा पलटवार

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले आहेत. त्यानंतर सत्ताधारी भाजपने पुढे येत राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधींनी वोट चोरीचा कांगावा करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ याचा प्रत्यक्ष पुरावा आहे, असं भाजपाने म्हटलं आहे.

Malegaon bomb blast case:
महाराष्ट्र

Malegaon bomb blast case : मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरणातील आरोपींच्या सुटकेला आव्हान, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सात आरोपींना नाेटीस

मुंबई : Malegaon bomb blast case : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेला पीडितांच्या कुटुंबीयांनी विशेष एनआयए न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने सरकारी वकील, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), महाराष्ट्र सरकार आणि निर्दोष झालेल्या सातही आरोपींना नोटीस बजावली आहे. माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुराेहित यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : ना अणुबाॅम्ब, ना हायड्राेजन बाॅम्ब , राहुल गांधी यांच्या निवडणूक आयाेगावर नव्याने फैरी पण जुनेच आराेप

नवी दिल्ली : Rahul Gandhi : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचाेरीचे आराेप केले आहेत. पुन्हा एकदा त्यांनी कर्नाटकातीलच एका विधानसभा मतदारसंघाचा संदर्भ देत या ठिकाणी 6,018 मते वगळण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयाेगावर अणुबाॅम्ब नव्हे तर हायड्राेजन बाॅम्ब टाकण्याचा दावा केला जात हाेता. पण हा बार फुसका ठरला आहे.

Ghayval gang
पुणे, महाराष्ट्र

Ghayval gang : आंदेकर टोळीपाठोपाठ आता पुण्यात घायवळ टोळीचा धुमाकूळ !

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेली आयुष कोमकरच्या हत्येची धक्कादायक घटना पुणेकरांच्या मनात अजूनही ताजी आहे. अशातच, काल मध्यरात्री पुण्यातील कोथरूड परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

municipal elections
महाराष्ट्र

municipal elections : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात २४,००० नवीन कर्मचारी होणार तैनात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सध्या पुण्यातही जोरात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता महापालिका निवडणूका जानेवारी अखेरीस पार पडणार आहेत.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, माेदींच्या निवृत्तीबद्दल बाेलायचा मला नैतिक अधिकार नाही

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा येत आहेत. मात्र, विराेधकांकडून माेदींच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, 75 वयानंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं मी म्हणू शकत नाही. मला बोलायचा नैतिक अधिकार नाही, असे म्हटले आहे.

Karnataka MLA
महाराष्ट्र

Karnataka MLA : मतचाेरीचा आराेप काॅंग्रेसलाच भाेवणार, फेरमतमाेजणीच्या न्यायालयाच्या आदेशाने कर्नाटकातील आमदाराचे पद धाेक्यात

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयाेगावर मतचाेरीचे आराेप करत आहेत. मात्र, कर्नाटकातील न्यायालयाने दिलेल्या एका निकालाने मतचाेरीचा मुद्दा काॅंग्रेसच्या आमदारावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांनी मतमाेजणीत केलेल्या गडबडीची दखल घेऊन कर्नाटक उच्च न्यायालयाने फेरमतमाेजणीचे आदेश दिले आहेत.

Election Commission
देश-विदेश

Election Commission : विरोधकांचे विविध आक्षेप, ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

विरोधी पक्षाकडून ईव्हीएमवर विविध आक्षेप घेतले जात असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. मतपत्रिकेवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे असतील. उमेदवारांचे क्रमांक आणि फॉन्ट आकार मोठा असेल, ज्यामुळे मतदारांना ते वाचणे आणि पाहणे सोपे होईल.