Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

MLA Sangram Jagtap : विकासकामांमध्ये अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आमदार संग्राम जगतापांचा महापालिकेवर हल्लाबोल

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करत नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्याचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा, निष्क्रियता आणि अतिक्रमणांना मिळणाऱ्या कथित संरक्षणामुळे शहरातील विकासकामे रखडली असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई

Chhagan Bhujbal : अनेक नेत्यांच्या मुलांबाळांना पक्षाने दिली संधी, तो न्याय मला का नाही : छगन भुजबळ यांचा सवाल

मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो. माझ्या जागी कुटुंबात मंत्रिपद मिळायला हवे अशी माझी मागणी होती. कारण, पक्षातील अनेक नेत्यांच्या मुलांबाळांना पक्षाने अश संधी दिलेली आहे. तो न्याय मला का नाही, असा सवाल अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला.

मुंबई

CM Devendra Fadnavis : सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण गरजेचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे.सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (2.0) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

CM Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : धारावीचा कायापालट होणार; 2028 पर्यंत 10 हजार घरे देण्याचे लक्ष्य, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प केवळ इमारती उभारण्याचा नसून धारावीकरांच्या सर्वांगीण विकासाचा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले. सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर आधुनिक, जागतिक दर्जाचा विकास करताना स्थानिक नागरिक, त्यांची उपजीविका आणि धारावीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Rajendra Jain
महाराष्ट्र

Rajendra Jain : राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी; विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व सोडावे लागले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती.

NEET Student
महाराष्ट्र

NEET Student : नीट विद्यार्थिनी आत्महत्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला नोटीस

नागपुरात नीट परीक्षेच्या एका विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिने लिहिलेली ‘सुसाईड नोट’ (आत्महत्येची चिठ्ठी) केस पेपरला जोडली नसल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

Pune water
पुणे

Pune water : पाणीकपातीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता, आज महापौर आणि प्रशासनाची तातडीची बैठक

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणेकरांवर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट अधिक गडद झाले आहे. या संभाव्य पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ८ ) महापौर आणि महापालिका प्रशासनाची महत्त्वाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष उद्याच्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागले आहे.

Sahebrao Kamble
महाराष्ट्र

Sahebrao Kamble : उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर साहेबराव कांबळे यांचा शिंदे गटात प्रवेश; यवतमाळ राजकारणात नवे समीकरण

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले साहेबराव कांबळे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. कांबळे यांच्या प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
मुंबई

Chhatrapati Shivaji Maharaj : इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार; महाराष्ट्र सरकारकडे इस्रायली वाणिज्य दूतांची विनंती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त इस्रायलने भारताशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इस्रायलच्या मुंबईतील महावाणिज्य दूतावासाने इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकारचे सहकार्य मागितले आहे.

Worli
मुंबई

Worli : वरळीत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू

मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्टीत ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : एलपीजी गॅस दरवाढीवर शरद पवारांचा हल्लाबोल; “महागाईची किंमत सरकारला चुकवावी लागेल

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला असून, केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडणार आहे. दरवाढीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.

Pune
पुणे

Pune : तुळापूरमधील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा मोठा छापा; १०७ तरुण आणि ४९ तरुणी यांच्यासह १५६ जण ताब्यात,

पुणे शहराच्या उपनगरात सुरू असलेल्या बेकायदा रेव्ह पार्ट्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यावर पहाटे धाड टाकली. या कारवाईत तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणी, अशा एकूण १५६ जणांना ताब्यात घेण्यात आले. या पार्टीमध्ये अमली पदार्थ आणि बंदी असलेल्या हुक्क्याचे सेवन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.