Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

जरांगे पाटील यांची निवडणूक काळात झाली माेठी चूक, मराठा नेते विनाेद पाटील यांचा दावा

माघार घेतली नसती आणि निवडणुका लढविल्या असत्या तर आज चित्र वेगळे झाले असते. आम्ही निवडून आलाे असताे किंवा पडलाे असताे.

Maratha protester
महाराष्ट्र

मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकाचा जुन्नरजवळ हार्ट अटॅकने मृत्यू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनाेज जरांगे यांच्यासाेबत निघालेल्या एका मराठा आंदोलकाचा जुन्नरजवळ हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे या आंदाेलकाचे नाव आहे.

महाराष्ट्र

तर मराठे मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही… मनाेज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना शब्द!

मराठा समाजाच्या मागण्यांची अंमजबजावणी करा..हेच मराठे मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असे आवाहन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे

virar building collapse news
मुंबई

विरार दुर्घटनेतील मृतांचा आकडा पंधरावर, अनधिकृत इमारत बांधणाऱ्या बिल्डरला अटक

विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत एका बाजूला कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री इमारत कोसळून झालेल्या या भयानक दुर्घटनेत संपुर्ण वसई विरार परिसर हादरला होता.

Radhakrishna Vikhe Patil
मुंबई

Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे यांची तयारी असेल तर सरकारही चर्चेसाठी तयार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

जर आंदोलकांची चर्चेची तयारी असेल, तर सरकारही चर्चेसाठी तयार आहे. परंतु त्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय असणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange :आझाद मैदानात आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी पोलिसांना दिले हमीपत्र

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आझाद मैदानात पोलिसांच्या परवानगीशिवाय आंदोलनास मनाई केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत.

CJI Gavai
देश-विदेश

CJI Gavai : न्यायव्यवस्थेतील घराणेशाही? सरन्यायाधीश गवई यांच्या भाताची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदासाठी शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून १४ वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस केली. या यादीत मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांचे भाचे राज दामोदर वाकोडे यांचेही नाव आहे.

Assam Cabinet
देश-विदेश

Assam Cabinet : आंतरधर्मीय व्यक्तिंमधील जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी आता सरकारचे लक्ष, आसाम कॅबिनेटचा महत्त्वाचा निर्णय

लोकसंख्येतील बदल व संभाव्य सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितले की, कॅबिनेट बैठकीत आंतरधर्मीय जमिनीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) मंजूर करण्यात आला आहे.

Mohan Bhagwat
देश-विदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला झालेला नाही, सरसंघचालक म्हणाले प्रेमामुळे विरोधाची तीव्रता कमी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला झालेला नाही. तरीही स्वयंसेवकांना समाजाबद्दल शुद्ध सात्विक प्रेम आहे. या प्रेमामुळे आता आमच्या विरोधाची तीव्रता कमी झाली आहे,

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी ५०० कोटी रुपये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Manoj Jarange
मुंबई

Manoj Jarange : मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलनास परवानगी मात्र सायंकाळी सहापर्यंतच

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच केलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आंदोलनाच्या दोन दिवस आधी आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यासोबतच त्यांना आठ अटी ठेवण्यात आल्या आहेत. आझाद मैदानातील आंदोलन स्थळाची जागा मर्यादित असल्यामुळे येथे फक्त पाच हजार पर्यंतच आंदोलकांना येण्याची परवानगी असणार आहे. त्यात इतरही संघटनांचे आंदोलन असले, याचीही काळजी मराठा आरक्षण आंदोलकांना घ्यावी लागणार आहे.

Sahyadri Hospital
महाराष्ट्र

Sahyadri Hospital : सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या लिव्हर प्रत्यारोपण प्रकरणाची हाेणार उच्चस्तरीय चाैकशी

डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या लिव्हर प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य आरोग्य विभागाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. चार आठवड्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.