Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

mohan bhagwat
देश-विदेश

mohan bhagwat : हिंदू राष्ट्र या शब्दाचा सत्तेशी काहीही संबंध नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

हिंदू राष्ट्र या शब्दाचा सत्तेशी काहीही संबंध नाही. जेव्हा आपण हिंदू राष्ट्र म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपण कोणालाही सोडून जात आहोत किंवा कोणाचा विरोध करत आहोत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil
मुंबई

Radhakrishna Vikhe Patil : जरांगे यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर सर्वांची भूमिका सकारात्मक : राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

सरकारकडून शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच जरांगे यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर आम्ही आज चर्चा केली आहे. सर्वांची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

देश-विदेश

Pinaki Mishra पिनाकी मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप, आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग व भारताच्या संरक्षण विषयांवर रशियाविरोधी प्रश्न विचारल्याचा आरोप

माजी खासदार व वरिष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग आणि संसदेत भारताच्या संरक्षण विषयांवर संवेदनशील प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय सुरक्षेला धक्का दिल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

Jaya Kishori
पुणे

प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.

Gunratna Sadavarte
महाराष्ट्र

किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल

मुंबईत २९ तारखेला आंदाेलन करण्याचा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी दिला हाेता. मात्र, आझाद मैदानात पुढील दोन आठवडे आंदोलन करता येणार नाही असा निर्णय उच्च न्यायालायने दिला आहे.

Prakash Ambedkar
पुणे

मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सांगितले की, ‘एखाद्या मंत्र्याला अमुकअमुक कारणामुळे काढा’ तर काढता येईल. हे राज्यघटनेतच आहे. असे असताना विद्यमान सरकारला पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीची घटनादुरूस्ती कशासाठी हवी आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार

मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मात्र, आझाद मैदान काही नाही? आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकील कोर्टात जाणार आहेत, असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र

एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा

सरकार उलथवून टाकण्याची भाषा करणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आयाबहिणींवर अपशब्द वापरणे हे कुणीही खपवून घेणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना दिला आहे.

महाराष्ट्र

Laxman Haake: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल, गेवराईतील राडा प्रकरणी कारवाई

Laxman Haake: बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला हाेता. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला फेकल्या हाेत्या. याप्रकरणी पाेलीसांनी लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : जरांगेंशी चर्चा करायला फडणविसांनी पाठवलेल्या ओएसडींच काम काय?

गणेशोत्सव अगदी जवळ आलेला असतांना मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत, अन् त्यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले अन् यासाठी त्यांनी आपले विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांना जरांगेंच्या भेटीला पाठवलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचे OSD राजेंद्र साबळे यांच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे.

Pankaj Bhoyar
महाराष्ट्र

Pankaj Bhoyar : भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री पंकज भोयर यांचा इतिहास काय सांगतो?

राज्यात नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नेमकं कोण होणार यावरून गेले काही महीने सतत चर्चा चालू आहेत. दहा महीने झाले तरी अद्यापही नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळत नसल्याने राजकीय वातावरण बरेच तापलेले आहे. अशातच महायुती सरकारने मात्र भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनाेज जरांगे यांना खासदार शाहू महाराज यांचा पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने यावेळी लक्ष घालून सर्वांचे हित जपून मार्ग काढला पाहिजे. मनाेज जरांगेंच्या मागण्या सरकार पूर्ण करेल, अशी आशा आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांना आमचा आधीपासूनच पाठिंबा असल्याचे काेल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.