Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rupali Chakankar
मुंबई

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक गडद होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची तब्बल सहा तास कसून चौकशी केली.

PM Modi’
देश-विदेश

PM Modi’ : “पेट्रोल-डिझेल वाचवा, वर्षभर सोने खरेदी करू नका”; जागतिक संकटावर पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जगभरात निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मोठे आवाहन करत पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर तातडीने कमी करण्याचे आवाहन केले आहे. हैदराबादमधील भाजपच्या जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले की, भारताकडे मोठ्या प्रमाणात तेलसाठे नसल्याने जागतिक इंधन संकटाचा थेट परिणाम देशावर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे.

POSH norms
मुंबई

POSH norms : नाशिक येथील ‘टीसीएस’ प्रकरणाची गंभीर दखल , ‘पॉश’चे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड

नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक (पॉश) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार यांनी शुक्रवारी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

Balasaheb Thackeray
मुंबई

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. या संदर्भात शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली.

Vijay Joseph
देश-विदेश

Vijay Joseph : तमिळनाडूत सत्तानाट्याला पूर्णविराम; विजय जोसेफ आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तमिळनाडूतील सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून टीव्हीकेचे प्रमुख विजय जोसेफ यांनी बहुमताचा दावा करत राज्यपालांची भेट घेतली आहे. १२० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले असून उद्या सकाळी १० वाजता चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Supriya Sule
पुणे

Supriya Sule : पुणे – मुंबई महामार्गांवर सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

खासदार सुप्रिया सुळे या पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान आज महामार्गावरून जात असताना एका वाहन चालक बेदरकार वाहन चालवत असल्याने सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात काही दुर्देवी घडले नाही.

High alert
देश-विदेश

High alert : दिल्लीत हाय अलर्ट; दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या गंभीर इशाऱ्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संवेदनशील, धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व पद्धतीने वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, स्पेशल सेल आणि निमलष्करी दलांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Gunaratna Sadavarte
मुंबई

Gunaratna Sadavarte : दिल्लीत हाय अलर्ट; दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

वैचारिक चर्चेमध्ये राज ठाकरे हारले तर त्यांनी उठाबश्या मारायच्या आणि मी जर हरलो तर राज ठाकरे जी म्हणतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे

Asaduddin Owaisi
महाराष्ट्र

Asaduddin Owaisi : निदा खान आणि मतीन पटेल न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध करतील, असदुद्दीन ओवेसी यांचा विश्वास

नाशिक येथे दाखल लैंगिक छळ आणि धर्मांतरास प्रोत्साहन दिल्याच्या गुन्ह्यातील आरोपी निदा खान हिला लपून राहण्यासाठी मदत केल्याप्रकरणी सहआरोपी करण्यात आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल न्यायालयात स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करतील, असा विश्वास एमआयएमचे प्रमुख बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 2026 ते 2029 या कालावधीसाठी शरद पवार हेच संस्थेचे अध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांच्याशिवाय अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड निर्विवाद ठरली.

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : नाशिकच्या टीसीएस प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, एफआयआर सार्वजिनक करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

नाशिकच्या टीसीएस प्रकरणी निदा खान अटक प्रकरणातील एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही तो सार्वजनिक करावा. कायद्याने त्यांचे काम करावे पण या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. एवढे दिवस पोलीस झोपा काढत होते का, याचे उत्तर द्यावे. या प्रकरणाला हवा देण्यात सरकारचा काही हात आहे का, हे उघड झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Nida Khan
मुंबई

Nida Khan : टीसीएस प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; निदा खान प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप

टीसीएसमधील निदा खान प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.