Vijay Joseph : तमिळनाडूत सत्तानाट्याला पूर्णविराम; विजय जोसेफ आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : Vijay Joseph गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तमिळनाडूतील सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून टीव्हीकेचे प्रमुख विजय जोसेफ यांनी बहुमताचा दावा करत राज्यपालांची भेट घेतली आहे. १२० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले असून उद्या सकाळी १० वाजता चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.Vijay Joseph

या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विशेष उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात हा ऐतिहासिक क्षण मानला जात असून तब्बल ५९ वर्षांनंतर राज्याला पहिला बिगर द्रविडी मुख्यमंत्री मिळणार आहे.Vijay Joseph



२३४ सदस्यीय तमिळनाडू विधानसभेत सत्तास्थापनेसाठी ११८ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. निवडणुकीत टीव्हीकेला १०८ जागांवर विजय मिळाला होता. विजय जोसेफ हे दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. त्यापैकी एका जागेचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाची संख्या १०७ वर आली होती. त्यामुळे बहुमतासाठी आणखी ११ आमदारांची गरज होती.

गेल्या काही दिवसांत राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू होत्या. अखेर विदुथलाई चिरुथैगल कच्ची (VCK), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि काँग्रेस यांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या सर्व पक्षांच्या आमदारांच्या समर्थनामुळे विजय जोसेफ यांनी १२० आमदारांचे समर्थनपत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले.

गेल्या आठवड्यात विजय जोसेफ यांनी राज्यपालांची चार वेळा भेट घेतली होती. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये आवश्यक संख्याबळ नसल्याने सरकार स्थापनेचा दावा फसला होता. आज सकाळीही शपथविधी होण्याची चर्चा होती, मात्र पुरेसे समर्थन न मिळाल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या राजकीय चर्चांनंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

या घडामोडींनंतर चेन्नईतील टीव्हीके मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे आणि विजय जोसेफ यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सोशल मीडियावरही समर्थकांनी “नव्या तमिळनाडूची सुरुवात” अशी प्रतिक्रिया देत उत्साह व्यक्त केला.

दरम्यान, एनडीएचा मित्रपक्ष अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK) ने टीव्हीकेवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांनी आमदारांची फोडाफोड आणि घोडेबाजार केल्याचा आरोप करत या सत्तास्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यात पुन्हा एकदा “रिसॉर्ट पॉलिटिक्स” चर्चेत आले आहे. काँग्रेसच्या काही आमदारांना हैदराबादमध्ये हलवण्यात आले असून टीव्हीकेच्या आमदारांना चेन्नईजवळील महाबलीपुरम येथील आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१६ मध्ये माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूत अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीकेला पाठिंबा देणाऱ्या VCK पक्षाने उपमुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मंत्रिमंडळात किती मंत्री असतील आणि कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व मिळेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Vijay Joseph set to become Tamil Nadu CM after securing majority support

महत्वाच्या बातम्या