Pune Municipal Corporation elections:पुणे महापालिका निवडणूक: आरक्षण सोडत जाहीर, १७३ पैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव
Pune Municipal Corporation elections:राज्यातील मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे काढण्यात आलेल्या या सोडतीत ५८ प्रभागांतील एकूण १७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.











