Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Raj Thackeray न्यायालयाने सांगितलेले असताना कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कारवाई हवीच, राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात, हे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना खायला घालू नये, असे न्यायालयाने सांगितलेले असताना त्यांना खायला घालण्यात येत असेल तर, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे

मुंबई

कबुतरांना खाद्य खायला घालणाऱ्या व्यावसायिकावर मुंबईत गुन्हा दाखल

मुंबईच्या फोर्ट येथील कबुतर खान्यामध्ये कबुतरांना खाद्य खायला घालणाऱ्या व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन ठक्कर असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

मुंबई

Nawab Malik माजी मंत्री नवाब मलिक यांचे पुनर्वसन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत माेठी जबाबदारी

राष्ट्रवादी काॅंग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे पुनर्वसन केले असून आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने माेठी जबाबदारी दिली आहे.

महाराष्ट्र

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण करणारे सूरज चव्हाण यांना प्रमोशन, प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केल्याप्रकरणी पक्षातून निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना तीन आठवड्याच्या आतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘प्रमोशन’ दिले.

Tanaji Sawant
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणाचा तपास बंद, बँकॉकमध्ये मित्रांसोबत असूनही खोटी तक्रार

माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मुलगा ऋषिराज सावंतच्या कथित अपहरणाचा तपास पोलिसांनी बंद केला आहे. ‘बी फायनल’ अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : ऐन गणेशोत्सवाच्या काळात दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन

दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत गोंधळ उडण्याची भीती आहे.जरांगे यांनी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल यांच्या जीवाला धोका, वकिलांनी राहुल गांधी यांच्या सहमतीशिवाय न्यायालयात दिले लेखी निवेदन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असे लेखी निवेदन त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले. मात्र यासाठी राहुल गांधी यांची सहमतीच घेतली नसल्याचे उघड झाले आहे. बुधवारी पुणे न्यायालयात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार म्हणाले राहुल यांच्या जीवाला धोका आहे. सावरकर मानहानी खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला लेखी माहिती दिली की “मत चोरी” प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुल गांधींना धोका वाढला आहे.

Dhananjay Munde
मुंबई

Dhananjay Munde : म्हणून सोडला नाही शासकीय बंगला, धनंजय मुंडे यांना मुंबईत मिळेना भाड्याने घर

लहान मुलीची शाळा याच भागात असून विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. मात्र याच परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणं सध्या कठीण आहे. त्यामुळे शासकीय बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र

Bhaskar Jadhav ठाकरेंच्या नेत्याची ब्राह्मण समाजावर संतापजनक टीका, पेशव्यांवरही घसरले

शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव आणि ब्राम्हण सहाय्यक संघात सध्या वाद सुरू आहे. ब्राह्मण समाजावर टीका करताना जाधव पेशव्यांवरही घसरले.

देश-विदेश

रायबरेलीत काॅंग्रेसकडूनच मतचाेरी, राहुल गांधींकडून ब्लंडर, भाजपचा पलटवार

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भारतीय जनता पक्षावर मतचाेरीचा आराेप केला आहे.

मुंबई

BJP : भाजपची साथ साेडली तरच पवार काका- पुतणे एकत्र येणार?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्यावरूनही अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र, मुंबई

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फटका बसणाऱ्या उद्याेगांना सर्वताेपरी मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

अमेरिकेने निर्बंध लावल्यानंतर त्याचा फटका बसणाऱ्या उद्योगांना मदत करण्यासाठी उच्च स्तरिय समिती तयार केली आहे. ही समिती त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन उद्याोगांना पर्यायी बाजारपेठ कोणती आहे