Chhagan Bhujbal : ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल, तर गप्प बसणार नाही, छगन भुजबळ यांनी जरांगे यांना ललकारले
ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांना जालना, आंतरवली सराटी, मुंबई, दिल्ली कुठे आंदोलन करायचे असेल तर त्यांनी ते करावे. मात्र ते नियमात करावे, अशा शब्दांत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांना ललकारले आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटीत आंदोलन करायचे असेल तर तिथे करावे. किंवा मुंबई, दिल्लीत कुठेही करावे. मात्र संविधानाने दिलेले अधिकार आहेत. त्यानुसार नियमात आंदोलन करावे, उपोषण कर, भाषण कर मात्र ते नियमात कर. कोणीही कुरघोडी करू नये.











