तुमचे काय धंदे याचे आत्मचिंतन करा, आमच्या नादाला लागू नका, संजय राऊत यांचा गिरीश महाजन यांना इशारा
तुम्ही कोण आहात? तुमचे काय धंदे आहेत, याचेही आत्मचिंतन करावे. मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबावर बोला. फार आमच्या नादाला लागू नका.
तुम्ही कोण आहात? तुमचे काय धंदे आहेत, याचेही आत्मचिंतन करावे. मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबावर बोला. फार आमच्या नादाला लागू नका.
टीव्हीवर जास्त बोलू नको, नाही तर तुझा मर्डर करायला वेळ लागणार नाही. जिवंत राहायचे असेल तर 50 लाख रुपये तयार ठेव, अशी धमकी देत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना खंडणी मागण्यात आली आहे . या प्रकरणी नागपूर येथील नंदनवन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना चांगलेच सुनावले. आमच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणात दिवाळीपर्यंत पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा लागू केल्या जातील. यामुळे करांचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होईल आणि लघुउद्योगांना फायदा होईल. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लगेचच, अर्थ मंत्रालयाने राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाला दोनस्तरीय जीएसटी दर रचना आणि निवडक वस्तूंसाठी विशेष दर प्रस्तावित केले आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. नांदेडच्या दौऱ्यावर असताना अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत घुसण्याचा इशारा दिला आहे.
कुणी कुठेतरी लाईन मारायला जाल तर तुझी लाईनच काढतो अन् टायर खाली घेतो. कुणालाही अजिबात कोणाला सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका.
मुंबईतील दादर कबुतरखाना बंद करण्याचा झाल्याने जैन समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. आरोग्याच्या कारणास्तव कबुतरखाना बंद करण्यावर मुंबई उच्च न्यायालय ठाम राहिल्याने आता याबाबत कायदेशीर आणि वैद्यकीय बाबींचा अभ्यास करण्याचा निर्णय जैन महासंघाने घेतला आहे.
स्वातंत्र्यदिनीलाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ स्थापनेची घोषणा केली. सीमावर्ती भागांमध्ये होत असलेल्या लोकसंख्यात्मक बदलांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत मोदींनी हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर जणू त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक नेत्यांनी असे आरोप सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदार संघात मतचोरीचा उच्चांक घडल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याने केला आहे.
मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या च्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी आज, स्वातंत्र्यदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेले डॉ. प्रांजल खेवलकर यांची अडचण आणखी वाढली आहे. एका महिलेच्या संमतीशिवाय तिचे फोटो व व्हिडिओ काढल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे.