Devendra Fadnavis : नवीन सुधारित युवा धोरणातून शाश्वत विकासाची वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन!
Devendra Fadnavis बदलत्या सकारात्मक विचारधारेचा समावेश हा नव्या युवा धोरणात परिवर्तन घडवू शकते’, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीने महाराष्ट्रातील युवकांसाठी नव्या पिढीच्या गरजांशी सुसंगत आणि प्रेरणादायी सुधारित युवा धोरण राबवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. फडणवीस म्हणाले की, ‘युवकांच्या विचारसरणीमध्ये आज प्रचंड बदल झाला आहे. त्यांच्या आकांक्षा, दृष्टीकोन, आणि जगण्याच्या पद्धतीही नव्या दिशेने जात आहेत.











