Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Chief Minister Devendra Fadnavis :छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

महाराष्ट्र

जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली

Pune ISIS
पुणे

Pune ISIS : पुणे आयसिस स्लीपर मॉड्यूल प्रकरणातील अकरावा संशयित रिझवान अटकेत

पुण्यातील आयसिस स्लीपर मॉड्यूल कटातील आणखी एक प्रमुख संशयित रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मौला याला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेला तो अकरावा आरोपी आहे. त्याच्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि त्याच्या अटकेसाठी विशेष NIA न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले होते.

Astra missile
देश-विदेश

Astra missile : स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकरसह ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाची कामगिरी

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दलाने (IAF) ‘अस्त्र’ या स्वदेशी बनावटीच्या बियाँड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल (BVRAAM) ची यशस्वी चाचणी पार पाडली आहे. ही चाचणी स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) सीकर प्रणालीसह सुखोई-30 MKI या फायटर जेटवरून ओडिशा किनाऱ्यालगत पार पडली.

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar रोहित पवारांना मोठा धक्का! ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSCB) घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

UNESCO
मुंबई

UNESCO : शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन, ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख

छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

महाराष्ट्र

Sanjay Raut पैशाच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल : संजय शिरसाट संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार

पैशाच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत.

Bhaskar Jadhav
मुंबई

Bhaskar Jadhav सरकारमधील अंतर्गत राजकारणातून संजय शिरसाट यांची ‘विकेट’ पडण्यासाठी डाव, भास्कर जाधव यांचा दावा

आधी धनंजय मुंडे, जयकुमार गोरे यांच्या नंतर आता संजय शिरसाट यांची ‘विकेट’ पडली पाहिजे, यासाठी हा डाव सुरु आहे. हे संपूर्ण प्रकरण सरकारमधील अंतर्गत राजकारणातून घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल

महाराष्ट्र

पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उल्लेखामुळे विधानपरिषदेत विरोधकांचा गोंधळ

कम्युनिस्टांविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षाचा संदर्भ देत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यांनी या विधेयकाला विरोध करत सभात्याग केला.

Sanjay Gaikwad
मुंबई

Sanjay Gaikwad : आमदार निवास कँन्टीनमधील मारहाण प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 अपमानित करणे, 115(2), मारहाण करणे , 3(5), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.