CM announces : स्मार्ट पोस्टपेड मीटरमुळे मिळणार वीज बिलात 10 टक्के सवलत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्यात स्मार्ट पोस्टपेड वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 27,826 फिडर मीटर आणि 38 लाख ग्राहक मीटर बसवण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर ऊर्जेच्या तासांदरम्यान वीज बिलात 10 टक्के सवलत दिली जात आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, राज्यात प्रथमच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.











