Union Home Ministry : केंद्रीय गृह मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय, गृहमंत्रालयाला मराठीतून आलेल्या पत्रांना उत्तर मराठीतूनच
हिंदीवरून महाराष्ट्रासारख्या राज्यात वाद उफाळून आला असताना आता केंद्रीय गृह मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता गृहमंत्रालयाला मराठीतून आलेल्या पत्रांना उत्तर मराठीतूनच देण्यात येईल. तामिळ भाषेतील पत्रांना तामिळमधूनच उत्तर दिलं जाईल. हा निर्णय केवळ मराठीसाठीच नव्हे तर देशातील सर्वच प्रादेशिक भाषांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.











