Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

Congress काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, तरच काँग्रेस युतीसोबत, मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रमच

समविचारी पक्ष असतील आणि काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, तरच काँग्रेस अशा युतीसोबत पुढे जाईल,” असे स्पष्ट मत व्यक्त करत महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या युतीबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवून दिले आहे

Ajit Pawar
पुणे

अजित पवार यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे

Nishikant Dubey
महाराष्ट्र

Nishikant Dubey : आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो, निशिकांत दुबे यांचं ठाकरे बंधूंना थेट आव्हान; भाषिक राजकारणावरून देशभर संताप

महाराष्ट्रात सध्या भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापले आहे. मीरा रोडमध्ये अमराठी व्यावसायिकाला मारहाण आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यात केले गेलेले वादग्रस्त विधान हे आता देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. यावरून भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेवर थेट हल्ला चढवत वादळ उठवले आहे.

Ramdas Athawale
मुंबई

Ramdas Athawale : राज ठाकरे यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य मागे घेतले नाही तर मनसेच्या उमेदवारांचा बहिष्कार, रामदास आठवले यांचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य आरोप करत केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. जर राज ठाकरे यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य मागे घेतलं नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा निषेध आणि बहिष्कार करावा, असे आवाहन आठवले यांनी केले.

Prithviraj Chavan
महाराष्ट्र

Prithviraj Chavan : मतदारांच्या याद्यांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काँग्रेसची समिती

विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या याद्यांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॉंग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती मतदार याद्यांशी संबंधित गैरप्रकार कसे रोखता येतील? याबाबत उपाय सुचवणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.

देश-विदेश

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यात; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला कडक इशारा

भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले, परंतु त्यांनी अद्यापही दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील बंगला क्रमांक 5 रिकामा केलेला नाही.

Madhya Pradesh
देश-विदेश

मध्य प्रदेशात मोहरम मिरवणुकीत गोंधळ: बॅरिकेडवर घोडे आदळवून पोलिसांवर केले जखमी

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात रविवारी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मिरवणुकीतील काही सहभागी निषिद्ध मार्गावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.

Bhojpuri actor
मुंबई

Bhojpuri actor : मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा, भोजपुरी अभिनेत्याची अशी मुक्ताफळे

मी मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा,” अशी मुक्ताफळे भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने उधळली आहेत. मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका फास्ट फूड विक्रेत्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडल्यानंतर, निरहुआने प्रतिक्रिया दिली. “मी मराठी बोलत नाही. मी भोजपुरी बोलतो. जर तुमच्यात दम असेल, तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा,” असे खुले आव्हानच त्याने दिले होते.

Tejashwi Yadav
देश-विदेश

तेजस्वी यादव यांचे शहाबुद्दीन जिंदाबाद’, मुस्लिम तृष्टीकरणासाठी कुख्यात डॉनचे लांगुलचालन

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात माजी खासदार आणि कुख्यात गुन्हेगार मोहम्मद शहाबुद्दीन याला ‘शहाबुद्दीनजी जिंदाबाद’ अशा घोषणा देत अभिवादन केले.

Chandrakantdada Patil
पुणे

पुणे पोलीस दलात लवकरच एक हजार पोलीस कर्मचारी, चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

पोलीस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, लवकरच त्यापैकी किमान एक हजार उमेदवारांना पुणे पोलीस दलात सहभागी करून घेतले जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

sanjay raut and eknath shinde
मुंबई

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांची दाढी अमित शाह कधी कापतील हे कळणार सुद्धा नाही, संजय राऊत यांचा पलटवार

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात ‘जय गुजरात’ म्हणतात. त्यामुळे ते महाराष्ट्राचे राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदे यांची दाढी खोटी आहे. ही दाढी अमित शाह कधी कापतील हे कळणार सुद्धा नाही. शिंदेंची दाढी ही गद्दारांची, अफजलखान आणि शाहिस्तेखानची आहे, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात घोषणा

उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक फायद्याची व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी येत्या पाच वर्षांत दरवर्षी 5 हजार कोटी, एकूण 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, सिंचनासाठी पंप अशा योजनांचा या निधीतून समावेश असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.