Devendra Fadnavis : बीड लैंगिक शोषण प्रकरणाची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
बीड येथील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. या प्रकरणी कुणालाही पाठिशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.











