Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Pankaja Munde
मुंबई

Pankaja Munde : भाजप जगातला सर्वात माेठा पक्ष, ठाकरे बंधू एकत्र आल्याने फरक पडणार नाही, पंकजा मुंडे यांचे मत

राज्यात सध्या उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. हे दाेघे बंधू एकत्र आल्याने राजकारणावर काय परिणाम हाेणार याचीही चर्चा हाेत आहे. भारतीय जनता पक्षावर याचा काय परिणाम यावरही अंदाज व्यक्त केले जात आहे. मात्र, भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, असे मत पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे, गजानन कीर्तिकर यांचा सल्ला

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. ते एकत्र यावेत अशी आमचीही इच्छा आहे. शिवसेनेचे तुकडे बघून आम्हालाही त्रास होतो, अशा माझ्या भावना आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांनी राज ठाकरेंना जवळ ठेवले पाहिजे, असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केल्या. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर बाळासाहेबांना ती खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान केले.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीनेच ठाकरे बंधू एकत्र!नितेश राणेंचा टोला

ज्यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडला, त्यांची अवस्था आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. आमच्या खणखणीत हिंदुत्वाची धास्ती घेत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा घणाघात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी केला.

Radhakrishna Vikhe-Patil'
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe-Patil : सर्वाधिक वेळ परदेशात देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल, राधाकृष्ण विखे- पाटील यांचा राहुल गांधींना टाेला

कॉग्रेस नेते राहूल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात जात असल्याने, देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल. निवडणूक प्रक्रियेच्या विरोधातील त्यांची विधाने म्हणजे मतदारांचा अपमान असल्याची टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

J.P. Nadda
देश-विदेश

निवडणुका हरल्याने नैराश्यातून राहुल गांधींचा बोगस आख्यान रचण्याचा डाव, जे.पी. नड्डा यांचा हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लेख निवडणूकांमागून निवडणुका हरल्याने आलेले नैराश्य आणि हताशीमुळे बोगस आख्यान रचण्याचा डाव आहे

Rahul Gandhi'
देश-विदेश

Rahul Gandhi’ : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाचा खरमरीत प्रतिवाद; ‘कायद्याच्या राज्याचा अपमान’ म्हणत सुनावले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप करत मतदार यादीतील आकडेवारीवर संशय व्यक्त केला. यावर निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त करत हा कायद्याच्या राज्याचा अपमान असल्याचे ठणकावून सांगितले आहे. आयोगाने स्पष्ट केले की, त्यांच्या सर्व यंत्रणा आणि आकडेवारी पारदर्शक असून, अपप्रचाराच्या माध्यमातून निवडणूक व्यवस्थेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.

महाराष्ट्र

खोटं बोलणं थांबवा, आत्मपरीक्षण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करत आज देशभरातील वर्तमानपत्रांत एक लेख प्रसिद्ध केला.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, नितेश राणे यांनी दिले आदित्य ठाकरेंच्या अटकेचे संकेत

अभिनेता डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत असायचा हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो अस म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिलेत.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली

Sanjay Turde
महाराष्ट्र

Sanjay Turde : मनसेचा मुंबईतील एकमेव माजी नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेत

मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहे. मुंबईतील कालिना या भागातील माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी राज ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्डे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut महाराष्ट्राची निवडणूक हायजॅक, राहुल गांधी यांच्या आरोपांना संजय राऊत यांचे समर्थन

लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये देशातील निवडणुकींसंदर्भात एक मोठा लेख लिहिला आहे.

State Election Commissioner Dinesh Waghmare
महाराष्ट्र

Dinesh Waghmare : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.