Ajit Pawar : माझी उणीदुणी काढली तर मी तुम्हाला तसं सोडणार नाही, अजित पवार यांचा विरोधकांना इशारा
माझी उणीदुणी काढली तर मी तुम्हाला तसं सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सहा गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, माळेगाव कारखान्याबाबत विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत.











